कुठतरी काहीतरी खूप सलावे
आज अचानक असे का वाटावे...
माहिती असुनही गप्पच बसावे
कशाला आपण कुणावर रुसावे...
आपणच आपले हसे का करावे
उगा मृगाजलाच्या मागे का धावावे...
क्षणभरच सुंदर स्वप्नात रंगावे
डोळे उघडताच विसरून जावे...
पाणी भरले डोळे जगा का दाखवावे
स्वच्छंदी हास्याने सर्वा जिंकावे...
सहजच दूरवर भरारीस जावे
स्वत:लाच मग हरवून यावे...
हरवता हरवता पुन्हा स्वत:स भेटावे
आज अचानक असे का वाटावे...
आज अचानक असे का वाटावे...
माहिती असुनही गप्पच बसावे
कशाला आपण कुणावर रुसावे...
आपणच आपले हसे का करावे
उगा मृगाजलाच्या मागे का धावावे...
क्षणभरच सुंदर स्वप्नात रंगावे
डोळे उघडताच विसरून जावे...
पाणी भरले डोळे जगा का दाखवावे
स्वच्छंदी हास्याने सर्वा जिंकावे...
सहजच दूरवर भरारीस जावे
स्वत:लाच मग हरवून यावे...
हरवता हरवता पुन्हा स्वत:स भेटावे
आज अचानक असे का वाटावे...