रविवार, २४ जुलै, २०११

मी...

निळ्या निळ्या समुद्राची
निळसर गहराई मी...
बेफानपणे वाहणारा
बंधरहित वारा मी...
चम् चम् चमकणारा
शीतल चन्द्रमाँ मी...
स्वत:भोवती गिरकी घेत
फिरणारी धरती मी...
क्षितिजाच्या पलिकडे उडणारे
एक स्वच्छंदी पाखरू मी...