मंगळवार, १६ मे, २०१७

वारा आणि झरा...

नकळत कुठूनसा आला बेफाम वारा
त्यासंगे दिशा बदली वाहणारा झरा

गडद गहिरे झ-याचे विस्कळीत अंतरंग
अचानक येऊन वा-याने उठविले तरंग

वा-याची पाहूनी धम्माल मस्ती
झ-याने केली त्याच्याशी दोस्ती

अलगद जुळून आले स्पंदन
झ-याने बांधून घेतले बंधन

वा-याने केले एकेदिवशी स्थलांतर
झ-याला सहन होईना हे अंतर

हरवली माघारी जाण्याची दिशा
सोडवेना तरी त्याला वेडी आशा

संतंत झुळझुळ वाहत राहील झरा
शोधित आपुला आगळा मित्र वारा


मंगळवार, ९ मे, २०१७

आठवणींचा क्षण ...

क्षण क्षण जोडत केली साठवण
साठवणीची मग झाली आठवण

आठवणींचा उघडला पेटारा
पेटाऱ्यावर स्थिरावल्या नजरा

नजरेतून ओघळले पाणी
पाण्याने गाईली सुंदर गाणी

त्या गाण्याचा उमगला अर्थ
अर्थाने केले जीवन सार्थ

सार्थकतेचा तो एकच क्षण
क्षणाची पुन्हा केली साठवण

साठवणीचा रचिला पाया
पायावर त्या जमली माया

मायेचा होई गोड आधार
आधारानेच होई स्वप्न्ने साकार

साकारता स्वप्न वाटे तृप्तता
तृप्तता देई खरी सकारत्मता

सकारत्मतेने जोडा क्षण
क्षणांची करा सुंदर साठवण