बुधवार, २८ जून, २०१७

धरती-आकाशाचे प्रेम...

प्रेम कसं करावं हे आज कळे
धरती-आकाश मिलनाचे हे सोहळे

हिरवागार शालूने सजली धरा
काळ्या कोटात आकाश साजरा

उधळता आकाशाने मोत्याचा सर
लाजूनी धरेने घेतला धुक्याचा पदर

बरसले प्रेम पावसाच्या रूपात
धरती-आकाश रमले प्रणयात

आकाशाच्या प्रेमाने आणली शीतलता
कमी होऊ लागते धरतीची तप्तता

घेऊनी कवेत आकाश धरेस न्याहळी
येई जन्मा नवजिवनाची लव्हाळी

धुंदता दाटूनी येई आसमंतात
नद्या-झरे वाहू लागती आनंदात

पाखरे वाजवती संगित छान
मोरांचे तर नाचण्यात ध्यान

काय सांगू किमया या मिलनाची
सुरुवात करी नवचैतन्न्याची