शुक्रवार, ७ जुलै, २०१७

आई

तू येताच जन्म माझा होई
बाईची होत असे मी आई

तुझ्या येण्याच्या चाहुलनेच बाळा
लागतो या जिवाला तुझा लळा

दिसामागून दिस जाती नव मास
तुझ्या असण्याने आनंदी ही कूस

मग एक दिवस तू या जगात येई
काय वर्णू ती लाडिक नवलाई

गोड तुझं हास्य ते निरागस
रडता तू मी होई उदास

अवतीभवती तुझ्या माझं जग
नसता तू होई माझी तगमग

विश्व तुझे बदलत जाई वयासोबत
माझ्यासाठी तर तूच सदा दौलत

गुंजत राहो तुझ्या यशाची नांदी
त्यातच असते मी खरी आनंदी

आज जरी मी झाले म्हातारी
तुझ्या लाडाची असे तशीच तयारी

काय सांगू हे तुला बाळा
तु तर माझा जिव लडिवाळा

बुधवार, ५ जुलै, २०१७

तुझी आठवण...

कधी कधी मन छान रमतं
कधी तुझ्या आठवणीत झुरतं

तू सांगितला होतास मंत्र जगण्याचा
प्रयत्न असतो माझा तसाच राहण्याचा

तुला आवडणार नाही मी रडलेले
म्हणून उगा  मना कसेतरी रमवले

खूप सावरलंय रे बरेच दिवस
कधी हसत तर कधी होत उदास

आवरणं आता झालंय कठीण
नशिबी आलेय हे हळहळणं

डोळयांनी सुद्धा सुरु केलीय बगावत
घळाघळा ओघळतात ते सर्वांदेखत

समजावू कसे या वेडया मनाला
प्रश्न पडला आहे हाच मला

जरी कितीही हे असले असह्य
खूप महत्त्वाचे आहे तुझे धेय्य

अवखळ मनाला आवरायला हवं
गुंतवीन त्याला देवून कारण नवं

काढीत राहयचं फक्त आठवण
होईस्तोवर तुझं पुनरागमन...