कसं समजावू या मनाला
छंद तुझाच त्याला लागला
किती राहिले जरी मी दुरी
का तुझ्याभोवती ते भिरभिरी
वळवावे कसे त्याचे ध्यान
नाही त्याला कसलचं भान
जवळ असूनही तुझ्यापाशी नाही
तुझ्यापासून दूरही जाता येत नाही
किती समजावलं किती मनवलं
हट्ट सोडायचा नाही ह्याने ठरवलं
ना कळे मनाला जगाची रिती
जडली ही कशी ही वेडी प्रिती
नाही कळत याला काळवेळ
बुद्धीशी नाही कसलाच ताळमेळ
काय म्हणू याच्या खुळेपणाला
दाखवी हे आस तुझी या जिवाला
कसला आहे याला भरवसा
का देतेय उगीच हे दिलासा
नेले मनाला भुलवून दूर
लगेच दाटूनी येते हूरहूर
खोटया स्वप्नात जाई रंगून
दूर राहू पाहे वास्तवापासून
आवरू म्हटलं तर आवरत नाही
मन हे आता सावरतच नाहीं
मग मीही मनाला हळूच जपलं
मनातला सारं मनातच लपवलं
नकळत भिजले डोळे गेले सांगून
पुरते वेडं झालयं हे बावरं मन...
छंद तुझाच त्याला लागला
किती राहिले जरी मी दुरी
का तुझ्याभोवती ते भिरभिरी
वळवावे कसे त्याचे ध्यान
नाही त्याला कसलचं भान
जवळ असूनही तुझ्यापाशी नाही
तुझ्यापासून दूरही जाता येत नाही
किती समजावलं किती मनवलं
हट्ट सोडायचा नाही ह्याने ठरवलं
ना कळे मनाला जगाची रिती
जडली ही कशी ही वेडी प्रिती
नाही कळत याला काळवेळ
बुद्धीशी नाही कसलाच ताळमेळ
काय म्हणू याच्या खुळेपणाला
दाखवी हे आस तुझी या जिवाला
कसला आहे याला भरवसा
का देतेय उगीच हे दिलासा
नेले मनाला भुलवून दूर
लगेच दाटूनी येते हूरहूर
खोटया स्वप्नात जाई रंगून
दूर राहू पाहे वास्तवापासून
आवरू म्हटलं तर आवरत नाही
मन हे आता सावरतच नाहीं
मग मीही मनाला हळूच जपलं
मनातला सारं मनातच लपवलं
नकळत भिजले डोळे गेले सांगून
पुरते वेडं झालयं हे बावरं मन...