मंगळवार, ७ एप्रिल, २००९

नको रे इतके जवळ येवूस

नको रे इतके जवळ येवूस
नको तू असं स्वत:ला हरवूस...

रंगबेरंगी फुलांची स्वप्ने तुझी
झोळी काट्यांनी भरलेली माझी...

आहे हौस तुला उंच उंच उड़ण्याची
पण वाढच खुंटलीय माझ्या पंखांची...

पहायचे आहे तुला खूप खूप आनंदी
नको लागूस तू माझ्या नादी...

असा कसा रे देवू तूला होकर
जर लिहला आहे नियतीनेच नकार...

नको नको ते जवळ येणे
एकत्र येऊन ते वेगळे होणे...

दाखवून सुखाच्या मृगाजला
नाही करायचे दू:खी तूला...

नको रे इतके जवळ येवूस
नको तू असं स्वत:ला हरवूस...

२ टिप्पण्या: