रविवार, २९ मार्च, २००९

वाटेच्या वाटसरा...

नाही कुठली मंजिल नाही ठावुक रस्ता
वाटेच्या वाटसरा तू पुढे जाणार रे कसा?

घडीभर घेवुनिया विसावा
चालणेच आहे तुझ्या नशिबा...

शोधुनिया काढ जरा आपुली वाट नवीन
चुकू नक्कोस आता चाल जरा जपून...

वाटेच्या वाटसरा प्रवासात येतील नविन गावे
कितीतरी ओळखीची होतील नविन नावे...

सोबत ठेवा घेवून जा नेहमी गमतीचा
सोडुनिया दे कचरा कटु आठवणीचा...

आता फार वेळ थांबून ना चालायचे
चालत रहा तुला आहे रस्ता शोधायचे...

स्वप्न्नांच्या गावा...

आज मला एक फुलपाखरू भेटलं
स्वप्न्नांच्या गावा चल म्हणालं...

दिले त्याने भुरुभुरु उडणारे हे पंख
घेत राहिले मग उंचउंच भरारीचे सुख...

मग घेवून गेले मला दुकानात
घे म्हणे रंगबेरंगी स्वप्ने फुकटात...

स्वन्ने ही कशी होती वेगवेगळी
काही हळवी काही खुपच निराळी...

नको नको म्हणता हलकेच येवून
स्वप्न्ने ही बसली डोळ्यात लपून...

हळूच उमलू लागे होठांची पाकळी
पाहुनी हे हसू लागली फूले सगळी...

अशी कशी ही स्वप्न्नांची रीत
गुणगुणु लागे मनही माझे गीत...

अशी ही फुलपाखाराने कमाल केली
स्वप्न्नांची दुनिया माझ्या पदरात टाकली...

मनात माझिया...

झुकल्या पापण्या मागचे भाव
कधी तू वाचशील का?

वेळ मिळलाच जर कधी
मनात माझिया डोकवशील का?

दिसेल कसे बरे तुला
कप्प्याकप्प्याचे मन माझे?

एक कप्पा आहे मायेने व्यापलेला
तर एक स्वप्न्नानी भरलेला

कुठे आहे लोभ जरासा
तर कुठे आहे राग जरासा

एका कप्प्यात राहते आशा
शेजारीच आहे निराशा

एक कप्पा आहे प्रेमाचा
आणि एक आहे मत्सराचा

वेडेपणाही राहतो तिथेच
अगदी बाजुला शाहणपणाच्या

गांभिर्यही भेटेल तुला तिथे
आणि सोबतीला निरागसताही

आनंदाची आहे जागा एक
दू:खही म्हणेल मला भेट

खोटेपणाही आहे जराजरासा
खरेपणाच्या दुश्मनीला

घालूनीया हातातहात अल्लडपणाच्या
सामजस्य राहते मजेत छान

असे हे कप्प्याकप्प्याने बनलेले
मन माझे भावनांनी भरलेले

नको होवूस मात्र अचंबित तेव्हा
पाहुनिया प्रत्येक कप्प्यात स्वत:ला

इतुश्या आयुष्यात...

इतुश्या आयुष्यात मी काय काय पाहिले
आज अचानकच याच्या हिशोबास बसले...

अनुभवला तो बालपणीचा निरागसपणा
कधी हासू तर कधी मस्तीचा तो नझराणा...

अभ्यासासाठीचा आईचा धाक कधी
तर मिळे छान कौतुकाची थाप कधी...

बाबांचा तर असे फार जीव
कशाला भासेल मग कुठलीच उणीव...

शाळेत होते अगदी पुस्तकी किडा
कॉलेजमध्ये उचलला खोडकरपणाचा विडा...

पाहिला मग पहिल्या पगाराचा आनंद
चालले होते हे आयुष्य छान बेधुंद...

वळणावळणाच्या या आयुष्यात
पाहिले मी भावनांचे रंगही सात...

पाहिली कधी आनंद देणारी नाती
तर कधी नकोशी झालेली नाती...

लाभली सुखदायी खुपशी मैत्री
आहे जिथे विश्वासाची खात्री...

कधी दिला सा-यांना मायेचा अनुराग
तर कधी कुणा दिला भयंकर राग...

मिळाला कधी विश्वासघाताचा अनुभव
तर कधी कुणी विश्वास न ठेवण्याचा घाव...

हुळहुळणा-या प्रेमाची गोडी चाखली
मग विरहाची मजाही घेतली...

होवून गेले कुणा परक्याचे जवळचे
तर कधी कुणा आपल्याचे लांबचे...

नशिबास सुख-दु:ख दोन्हीही आले
कडू-गोडश्या अनुभवाने हे आयुष्य भरले...

काय बरे असेल पुढचा नियतीचा घाट
याचीच पाहत आहे मी आता वाट...

इतुश्या आयुष्यात आता काही पहायचे ना उरले
नसे खंत कसलीच आज जरी हे डोळे मिटले...

वेडं पाखरू

जग किती निष्टुर असतं
निष्पाप पाखरालाही छळतं...

उंच उड़ण्याचे स्वप्न्न त्याचे असते
पण अचानक नियती त्याचे पंखच कापते...

इतकचं काही त्याचे दुर्दैव नसतं
बिचा-याचं मग घरटंही हरवतं...

गरज असते त्याला थोड्याशा दिलाश्याची
पण पदरी पड़ते अवहेलना सा-यांची...

ना कळे त्याला कसं जगावं
दू:ख आपलं कुणाला सांगावं...

हळूच मग एक दिवस वेडं सावरू पाहतं
खोटं खोटं ते हसूही लागतं...

मनातला सल लपवू ते पाहतं
ह्रदयातली कळ एकटच सोसतं...

किती पाहशील रे देवा त्याची परीक्षा
कधी रे संपेल त्याची ही शिक्षा...

मारू देतना त्यालाही उंच भरारी
चाखु देतना त्यालाही जीवनाची खुमारी...

होईल तेही मग खूप आनंदी
घेईल भरारी तेही छान स्वच्छंदी...

याचा अर्थ...

प्रत्यक्ष देता येत नाही याचा अर्थ असा नाही की
माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी नाही...

तुझ्याशी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की
तुला मी विसरले आहे...

तुला भेटत नाही याचा अर्थ असा नाही की
मला तुला भेटावेसेच वाटत नाही...

मी हसतेय याचा अर्थ असा नाही की
मी खरोखरीच आनंदात आहे...

तुझ्यापासून दूर आहे याचा अर्थ असा नाही की
मी तुझ्याजवळच नाही...

श्वास चालू आहे याचा अर्थ असा नाही की
आयुष्य जगत आहे...

मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की
तुझा विचारच करत नाही...

अश्रु वाहत असतात याचा अर्थ असा नाही की
तुझ्या आठवणीना त्यात विसर्जित केले आहे...

देवावर चिडले आहे याचा अर्थ असा नाही की
देवाकडे तुला मागत नाही...

रोजचे नीट चालले आहेत याचा अर्थ असा नाही की
मी स्वत:ला सावरलेले आहे...

भावना व्यक्त करत नाही याचा अर्थ असा नाही की
मी तुझ्यावर प्रेमच करत नाही...

तुझ्यावर प्रेम करते याचा अर्थ असा नाही की
माझ्या प्रेमाने तुला त्रास देणार आहे...

तुला त्रास देणार नाही याचा अर्थ फ़क्त इतकाच की
दूर राहूनही तुझ्यावर प्रेम करणं थांबवणार नाही...

एक प्रश्न...

कधी कधी पडणारा प्रश्न वाटतो सोपा
मात्र उड़वितो तो सगळ्याच्या झोपा...

मनाला टाकतो नुसते गोंधळात
इवलासा मेंदू पडतो मग विचारात...

एका प्रश्नातून जन्मातात अनेक प्रश्न
आपण मात्र उत्तर शोधण्यात मग्न...

कळतच नाही कसा सोडवावा हा गुंता
अजून किती करत रहावी ही चिंता...

डोक्याने दिलेले उत्तर मनाला पटेना
आयुष्याला काडीचा सूरच गवसेना...

प्रश्न सोडाविता सोडाविता संपेल हे जीवन
तरीही अनुत्तरित असे प्रश्न ठेवा याचे भान...

मी जर नसेन तेव्हा...

मी जर नसेन तेव्हा...
कुणाशी रे भांडशील?

मी जर नसेन तेव्हा...
कुणावर वैतागशील?

मी जर नसेन तेव्हा...
कुणाच्या वेडेपणावर हसशील?

मी जर नसेन तेव्हा...
आठवणीने हळहळशील का?

मी जर नसेन तेव्हा...
नसण्याने माझ्या दोन टीपे गाळशील का?

मी जर नसेन तेव्हा...
एकदा तरी मला परत ये म्हणशील का?

तुला पाहुनी...

तुला पाहुनी हास्य उमलते
कळत नकळत...

सुखावून जाते तुझे अस्तित्व
कळत नकळत...

भारवूनी टाकतो तुझा सहवास
कळत नकळत...

नसता तू होतो जीव कासावीस
कळत नकळत...

इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

आधी मला नेहमीच एक प्रश्न पड़े
इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

ते सतत कुठल्यातरी विश्वात हरवणे
ते उगी कसलासा विचार करून हसणे...

होवूनिया भावनावश टीपे गाळणे
कधी आठवणीने प्रफुल्लित होत गुणगुणणे

कधी जागेपणी अन् झोपेतही करणे विचार कुणाचा
दचकून हळूच लाजणे भास होता कुणाचा

करूनिया स्वप्न्नरंजन करावी स्वत:चीच करमणूक
ओळखीच्याच माणसांत होवूनिया जावे आगंतुक

आज येता वेळ स्वत:वरी सुटे हे कोडे
इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

श्रावणसरी...

श्रावण येई घेवूनी सरीवर सरी
संगीत निसर्गाचे चाले असेच एकसूरी...

वातावरणात असे एक आगळी बेधुंदी
करी झोंबरा गारवा मना आनंदी...

ही भिजलेली झाडे अन् ह्या बहरलेल्या वेली
पाऊलवाटही कशी हिरवळीतून नागमोडी चाली...

किलबिलत चाले हितगुज पक्ष्यांची
नभी दाटे पाउस काढूनी नक्षी रंग छटाची...

कोण करीत असे ही सारी किमया
लावित असे जी सकलांना हसवाया...

कशास मग करू चिंता उद्याची
क्षण आताचा मी जगेन स्वच्छंदी...

तुझी अन माझी प्रीत...

सरीवर सरी चिंब करती वृक्ष-वेली
पहा सूर्या लपवी मेघांची ती सावली...

लपून बसल्या कळया पानांमागे
भुंगा गुणगुणत कुठले गुजगोष्ट सांगे

दूर कुठे त्या तिथे झाडावरी गाई कोकीळ गीत
अशाच एका भिजल्या क्षणी बहरून येई आपुली प्रीत...

मिसळे पावसाचा थेंब जसा मातीमध्ये
विरघाळावे मी ही तसेच तुझ्यामध्ये...

आशा-निराशा

जीवन म्हणजे आशा आणि निराशेचा खेळ
नाहीतर असतो का कधी कशाचा मेळ

क्षणात आशा हसवून जाई
क्षणात निराशा पदरी येई

सुख म्हणजे असे नुसते मृगजळ
दू:ख इतुके की कमी पड़े अभाळ

मग का जगावे होवूनी नियतीचे गुलाम
तोडून टाकावेत बांधलेले सगळे लगाम

नसलेच हे आपुले जीवन जर
उरेलच कसा आशा-निराशेचा खेळ तर

जावे जिकूंनी तोडून सारे पाश
बरे आहे ते रहाण्यापेक्षा हताश

कालचा पाउस...

कालचा पाउस काही वेगळाच होता...
रिमझिम पडताना गुजगोष्ट करून गेला...

हसवता हसवता हळूच रडवून गेला...
उगाच तुझी आठवण करून गेला...

हुरहुर मनीची कशी तुला कळेना...
झुरवतात या कोसळणा-या धारा...

भुरळ पडितो उगा झूळझूळणारा वारा...
वेड लावितसे टपटप पड़णा-या सुंदर गारा...

किती सहन करू रे तुझा मी नखरा...
सोड ना सख्या आता तरी रुसवा...

कसा सहन करू आता हा दुरावा...
तूच आहेस रे माझ्या मनाचा विसावा...

मैत्री

तुझी अन् माझी मैत्री
जगावेगळी हळूच उमलून येणारी जशी कळी

निरागस जशी हसना-या मुलासारखी
मनमोहक फुलाना-या फुलासारखी

कधी खुदकन खुप हसवाणारी
तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारी

कधी हवी हवी वाटणारी
कधी नकोशी वाटणारी

नसे गरज जिथे शब्दांची
भाषा कळे तिथे नजरेची

नाहीच कधी तुटणार हे बंध
आपल्या मैत्रितच विसावलेय आपले जग सबंध

पावसाचा चमत्कार...

असेच एकदा काय झाले
धरती आणि आभाळ खुप खुप भांडले...

एकमैकावर रुसून दूर जावून बसले
सगळ्यानी समजावले तरी त्यांनी नाही ऐकले...

पहिल्या प्रेमाचा पहिला रुसवा
नव्हते सोडत कुणीच फुगावा...

कुणालाच सापडत नव्हता भांडणाचा दुवा
कसा कुणी मग हा गुंता सोडवावा?...

जरी होत होता हा दुरावा फास
दोघांनाही होता एकमेकांचा ध्यास...

होत असे दोघांनाही त्रास
रहात असत दोघेही उदास...

विरह होत नव्हता सहन
धरती सहत असे उन्हाचे दहन...

आभाळाचेही होते खिन्न मन
केले त्याने सुरु रुदन...

आल्या मग पावसाच्या सरीवर सरी
चिंब भिजली धरती सारी...

धरती-आकाशा मिलनाची ही तयारी
अचंबित होवून पाहती सर्व मजा ही न्यारी...

दोघेही झाले खुश फार
मिलन होताच नेसला धरतीने शालू हिरवागार...

आभळही नटले सात रंगांनी शानदार
जोड़े दोन जिवांना असा हा पावसाचा चमत्कार...

का हे असे घडले?

नको नको म्हणता मन हे गुंतले
का हे असे अचानक घडले...

आधी होते कसे मस्त चाललेले
उगाच का स्वत:च स्वत:ला विस्कटले...

कधी हास तर कधी भकास
छळत असतात तुझेच भास...

आहे काही तरी यात ख़ास
पण तू मात्र या सर्वपासून उदास...

तू नसता खुप बोलायाचे ठरवते
तू असताना मात्र गप्पच राहते...

कधीतरी सगळे सांगावेसे वाटते
मग मात्र स्वत:ला आवरते...

नाही कळणार तुला माझ्या भावना
लपवलेल्या आहेत मी सा-या वेदना...

हसरा हा चेहरा फसवे सर्वाना
त्यातच आहे ना आनंद सगळ्याना...

आज काल कळतच नाही माझेच मला

आज काल कळतच नाही माझेच मला
का उगाच हा वेडा छंद जडला...

हे असे हळवे होणे, हे पाणावणारे डोळे
असे अचानक काय होते हे ना कळे...

का हे मन तुझासाठी सतत झुरे
अनुत्तरित राहती प्रश्न सारे...

कोण खरे ते मजला ना कळे
तू की तुझे बोलणारे डोळे...

असा कसा हा जीव जड़े
जाणुनी ही सगळे असे विपरीत का घडे...

न बोलताच सगळे उमजून येते
असे कसे रे हे आपले नाते?...

आज काल कळतच नाही माझेच मला
का उगाच हा वेडा छंद जडला...