रविवार, २९ मार्च, २००९

पावसाचा चमत्कार...

असेच एकदा काय झाले
धरती आणि आभाळ खुप खुप भांडले...

एकमैकावर रुसून दूर जावून बसले
सगळ्यानी समजावले तरी त्यांनी नाही ऐकले...

पहिल्या प्रेमाचा पहिला रुसवा
नव्हते सोडत कुणीच फुगावा...

कुणालाच सापडत नव्हता भांडणाचा दुवा
कसा कुणी मग हा गुंता सोडवावा?...

जरी होत होता हा दुरावा फास
दोघांनाही होता एकमेकांचा ध्यास...

होत असे दोघांनाही त्रास
रहात असत दोघेही उदास...

विरह होत नव्हता सहन
धरती सहत असे उन्हाचे दहन...

आभाळाचेही होते खिन्न मन
केले त्याने सुरु रुदन...

आल्या मग पावसाच्या सरीवर सरी
चिंब भिजली धरती सारी...

धरती-आकाशा मिलनाची ही तयारी
अचंबित होवून पाहती सर्व मजा ही न्यारी...

दोघेही झाले खुश फार
मिलन होताच नेसला धरतीने शालू हिरवागार...

आभळही नटले सात रंगांनी शानदार
जोड़े दोन जिवांना असा हा पावसाचा चमत्कार...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा