रविवार, २९ मार्च, २००९

इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

आधी मला नेहमीच एक प्रश्न पड़े
इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

ते सतत कुठल्यातरी विश्वात हरवणे
ते उगी कसलासा विचार करून हसणे...

होवूनिया भावनावश टीपे गाळणे
कधी आठवणीने प्रफुल्लित होत गुणगुणणे

कधी जागेपणी अन् झोपेतही करणे विचार कुणाचा
दचकून हळूच लाजणे भास होता कुणाचा

करूनिया स्वप्न्नरंजन करावी स्वत:चीच करमणूक
ओळखीच्याच माणसांत होवूनिया जावे आगंतुक

आज येता वेळ स्वत:वरी सुटे हे कोडे
इतके का कुणी होते कुणासाठी वेडे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा