रविवार, २९ मार्च, २००९

इतुश्या आयुष्यात...

इतुश्या आयुष्यात मी काय काय पाहिले
आज अचानकच याच्या हिशोबास बसले...

अनुभवला तो बालपणीचा निरागसपणा
कधी हासू तर कधी मस्तीचा तो नझराणा...

अभ्यासासाठीचा आईचा धाक कधी
तर मिळे छान कौतुकाची थाप कधी...

बाबांचा तर असे फार जीव
कशाला भासेल मग कुठलीच उणीव...

शाळेत होते अगदी पुस्तकी किडा
कॉलेजमध्ये उचलला खोडकरपणाचा विडा...

पाहिला मग पहिल्या पगाराचा आनंद
चालले होते हे आयुष्य छान बेधुंद...

वळणावळणाच्या या आयुष्यात
पाहिले मी भावनांचे रंगही सात...

पाहिली कधी आनंद देणारी नाती
तर कधी नकोशी झालेली नाती...

लाभली सुखदायी खुपशी मैत्री
आहे जिथे विश्वासाची खात्री...

कधी दिला सा-यांना मायेचा अनुराग
तर कधी कुणा दिला भयंकर राग...

मिळाला कधी विश्वासघाताचा अनुभव
तर कधी कुणी विश्वास न ठेवण्याचा घाव...

हुळहुळणा-या प्रेमाची गोडी चाखली
मग विरहाची मजाही घेतली...

होवून गेले कुणा परक्याचे जवळचे
तर कधी कुणा आपल्याचे लांबचे...

नशिबास सुख-दु:ख दोन्हीही आले
कडू-गोडश्या अनुभवाने हे आयुष्य भरले...

काय बरे असेल पुढचा नियतीचा घाट
याचीच पाहत आहे मी आता वाट...

इतुश्या आयुष्यात आता काही पहायचे ना उरले
नसे खंत कसलीच आज जरी हे डोळे मिटले...

२ टिप्पण्या: